Home Blog

वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकार दरवर्षी खर्च करणार अडीच हजार कोटी : डॉ. नितीन राऊत

मुंबई : वीज क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा घडविण्याचा संकल्प असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी आणि विद्यमान पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी दरवर्षी अडीच हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ऊजार्मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

राज्यातील लोकप्रतिनिधींकडून नवीन उपकेंद्रे, नवी रोहित्रे (डीपी) बसविण्याची आणि उपविभागाचे विभाजन करण्याची सातत्याने मागणी होते. या विषयावर उजार्मंत्री डॉ. राऊत यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीस उर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासह महावितरणचे सर्व संचालक, प्रादेशिक संचालक उपस्थित होते.

राज्य शासन शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे. कृषी पंप वीज धोरणाअंतर्गत पारंपरिक पद्धतीने कृषी पंप जोडण्या देण्यासाठी दरवर्षी दीड हजार कोटी खर्च करण्याचे ठरवले आहे. या व्यतिरिक्त वीज क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा उभारणीसाठी पुढील 3 वर्षात दरवर्षी आणखी एक हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक, नागरी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती आणि नवे सब स्टेशन व नवे रोहित्रे बसविण्यासाठी हा निधी खर्च केला जाईल, असे राऊत यांनी सांगितले.

औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणीला प्राधान्य देण्यात येत आहे. यानुसार राज्यातील एमआयडीसी क्षेत्रात पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी पुढील 3 वर्षात 800 कोटी खर्च करण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय नव्या सबस्टेशन, नवे रोहित्रे बसविणे आणि उपविभाग विभाजन मागणी यासाठी पुढील ३ वर्षात एक हजार कोटी खर्च करण्यात येतील. याशिवाय नागरी भागात वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी पुढील ३ वर्षात १ हजार २०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम पुढील दोन आठवड्यात निश्चित केला जाईल आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल,ह्व अशी माहिती राऊत यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना दिली.

पर्यावरणस्नेही इंधननिर्मितीवर भर द्यावा, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

नागपूर : मर्यादित नैसर्गिक स्त्रोतांचा सध्या अमर्यादित वापर होत आहे. वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही इंधनाच्या वापरात वाढ दर्शवते. शाश्वत विकासासाठी पर्यावरणस्नेही इंधननिर्मितीवर भर देण्यात यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
शनिवारी संरक्षण क्षमता महोत्सवाचे (सक्षम) राजभवन येथे डिजिटल उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

भारत पेट्रोलिअम, गॅस अथॉरिटी आॅफ इंडिया (गेल), इंडियन आॅईल कॉपोरेशन या इंधन क्षेत्रातील अग्रेसर कंपन्याकडून संयुक्तरित्या ‘हरित व स्वच्छ ऊर्जा’ या संकल्पनेवर आधारित ‘सक्षम’ अभियानात इंधन बचतीवर व स्वच्छ पर्यावरणासाठी जनजागृती होणार आहे. हा उपक्रम 15 फेब्रुवारीपर्यत चालणार आहे.
पेट्रोलियम व वायु इंधनासोबतच सौरऊर्जा, पवन उर्जेच्या वापरासाठी लोकांना प्रेरीत करण्याची गरज असल्याचे राज्यपाल म्हणाले.
भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक रवि, गेलचे कार्यकारी संचालक गौतम प्रसाद, इंडियन आॅईल कॉपोरेशनचे कार्यकारी संचालक अमिताभ अखौरी यांनी विचार व्यक्त केले. तेल उद्योग महाराष्ट्राचे राज्य समन्वयक संतोष निवेंडकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. सूत्रसंचलन श्रीमती निलिमा यांनी तर श्री.कृष्णमुर्ती यांनी आभार मानले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दीक्षाभूमीजवळील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट दिली. तसेच, संस्थेमार्फत चालविल्या जाणाºया अभ्यासक्रमांची माहिती घेतली.
दसाल्ट एव्हिऐशन (फ्रान्स) व कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या एरोनॉटीकल स्ट्रक्चर व इक्युपमेंट फिटर या अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेला देखील भेट दिली. कार्यशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तत्पूर्वी संस्थेचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे संस्थेच्या विस्तृत कायार्ची माहिती दिली. कौशल्य विकास विभागाचे आयुक्त कुशवाहा यावेळी उपस्थित होते.

राज्यात कोरोना लसीकरण मोहीम प्रारंभ

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे शुभारंभ करण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक (सुमारे ६४ टक्के) कर्मचाºयांना लस देण्यात आली. दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयातील लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अमीन पटेल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.
राज्यात सकाळी ११ वाजेनंतर लसीकरणाला सुरूवात झाली. काही ठिकाणी कोविन-अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचण आल्याने मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र्र शासनाने परवानगी दिली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाºयांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
राष्ट्र आणि राज्यस्तरावरील शुभारंभानंतर जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. सातारामध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, औरंगाबादेत पालकमंत्री सुभाष देसाई, जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील, नागपूर येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, लातुरमध्ये पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, यवतमाळ-दारव्हा येथे पालकमंत्री संजय राठोड, कोल्हापूर येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, रायगड-अलिबाग येथे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला.

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात, भीती नको, सुनील केदार यांचे आवाहन

मुंबई : राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती बाळगू नये. विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही, अशी माहिती पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार [ animal husbandary minister ] यांनी दिली. समाजमाध्यमे व इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसारित होणाºया अफवा व अकारण भीती पसरविणाºया बातम्यांपासून सावध राहण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले.

यावर भर द्यावा
पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठे सोबत संपर्क टाळा. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नये तर जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवावे. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवावे. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा. पूर्ण शिजवलेले मांस खावे. आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.

हे करू नका
कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.अर्धवट शिजलेले मांस, चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.आजारी दिसणाºया सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका. टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क करावा. राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी. तसेच, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी केले आहे.

 

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts