Home मुंबई राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

40

मुंबई : जिजाऊ माँसाहेब आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन केले. मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, की संकट काळात न डगमगता धैर्य आणि शौर्याने पुढे जाण्याची प्रेरणा म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वाभिमान जपण्याचा आणि दुर्बल, वंचितांच्या रक्षणाचा मूलमंत्र दिला. रयतेचे राज्य स्थापन व्हावे यासाठी त्यांनी मुत्सद्दीपणा आणि धीरोदात्तपणे पावले टाकली. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीतही जिजाऊ माँसाहेब यांचा करारी बाणा आणि धडाडी प्रेरणादायी अशीच आहे. प्रेरणेचा अखंड स्त्रोत, वंदनीय राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

जिजाऊ माँसाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच वाटचाल
स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. माँसाहेबांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला, राष्ट्रासाठी त्यागाची आणि जगण्याची प्रेरणा दिली. कुठल्याही संकटावर मात करण्याचे बळ दिले. जिजाऊ माँसाहेबांच्या स्वाभिमानी विचारांवरच आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक आव्हानावर मात करण्याचे बळ माँसाहेबांच्या संस्कारी विचारातच आहे, अशा शब्दांत राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे स्मरण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्ततेची वाट राजमाता माँ जिजाऊंनी महाराष्ट्राला दाखविली. त्यांच्या प्रेरणेतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत शेतकºयांचे, रयतेचे स्वराज्य स्थापन केले. माँसाहेबांच्या ज्या विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली, त्याच विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here