धान्य गोदामे उभारण्यासंबंधी विधानपरिषदेच्या उपसभापतींच्या सूचना

राजधानी मुंबई

मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यात शेतकºयांच्या प्रस्तावानुसार ४७ नवीन धान्य गोदामे उभारण्यास मंजूरी मिळाली आहे. या योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकरी आणि महिला बचतगटांपर्यंत पोहोचवावी. त्यामुळे नवीन गोदामांसाठी प्रस्ताव प्राप्त होऊ शकतील. याचबरोबर जुन्या पडीक इमारतींचे गोदामात रूपांतर करणे, नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जुन्या गोदामाची दुरुस्ती करण्यात यावी व ती शेतकºयांना उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे [ dr neelam gorhe ] यांनी दिले.

शेतकºयांच्या धान्य साठवणुकीसाठी मंडळस्तरावर गोदामे उपलब्ध करण्याबाबत वेबिनारद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे, कृषी विभागाचे सहसचिव गणेश पाटील, पोखरा योजनेचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी, नागपूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य, शेतकरी अ‍ॅड. निलेश हेलोंडे पाटील आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हवामान बदलांमुळे उद्भवणाºया संकटांनी पिकांचे नुकसान होते आहे. शेतकºयांना धान्य साठवणूक करण्यासाठी गोदामे उपलब्ध असल्यास त्यांचे नुकसान होणार नाही. धान्य साठवणूक करून आवश्यक तेव्हा विकण्याची मुभा शेतकºयांना मिळण्यासाठीची चळवळ व्यापक होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा विशेष सहभाग घेऊन कृषी विभाग आणि वखार महामंडळाच्या सहाय्याने गोदाम उभारणे, त्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतकºयांचे नुकसान होऊ नये आणि दारिद्रय निर्मुलनासाठी पोखरा योजनेमध्ये लोकांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. रोजगार हमी योजनेतून गोदामे बांधकाम घेता येईल का याबाबत कृषी विभागाने रोहयो विभागामध्ये प्रयत्न करावा. धान्याची साठवण करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने बनविण्यात आलेल्या बॅगची माहिती अधिकाअधिक शेतकºयांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचेही डॉ. गोºहे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *