Home राष्ट्रीय भारतीय जवानांच्या निर्धारापुढे चिनी सैनिकांची माघार

भारतीय जवानांच्या निर्धारापुढे चिनी सैनिकांची माघार

71

नवी दिल्ली : भारत-चीनदरम्यानच्या प्र्रत्यक्ष नियंत्रण रेषा अर्थात एलएसीवरून चीनने आपले १० हजार सैनिक मागे घेतल्याचे वृत्त आहे. भारतीय हद्दीपासून हे सैनिक तब्बल २०० किमी मागे हटले असून लडाखमध्ये सध्या थंडीचा जबदस्त तडाखा आणि भारतीय जवानांच्या निर्धारापुढे त्यांचे काहीही चालले नाही.

मागील वर्षात गलवान खोºयापासून पँगाँग त्सो भागापर्यंत विविध ठिकाणी चीनने तब्बल ५० हजार सैनिक तैनात केले होते. मात्र चिनी सैनिक या भागातील भयंकर थंडी सहन करू शकले नाहीत.
या भागात सध्या उणे १० अंश सेल्सिअस तापमान आहे. या तापमानात भारतीय सैनिकांनी तग धरली; परंतु चिनी सैनिकांना ही थंडी असह्य झाल्याने चीनने अखेर १० हजार सैनिक मागे घेतले. आक्रमक विस्तारवादी असलेल्या चीनने अखेर निसर्ग आणि भारतीय सैनिकांच्या निधार्रापुढे नमते घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here