Home उपराजधानी नागपूर नागपुरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण

नागपुरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण

77

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे [ nagpur mahanagar palika ] येत्या १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण सुरू होणार आहे़ यासाठी आठ केंद्राची निवड करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात शहरातील ज्या आरोग्य कर्मचाºयांनी ‘कोव्हिन अ‍ॅप’वर नोंदणी केलेल्या कर्मचाºयांना लस दिली जाणार आहे.

या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्यासह सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी, सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी, पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आठ केंद्र
सदर रोगनिदान केंद्र, महाल रोगनिदान केंद्र, पाचपावली सुतिकागृह, के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), एम्स, डागा हॉस्पिटल या आठ ठिकाणी लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाºयांना लस देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर १०० कर्मचाºयांना लस दिली जाणार आहे.

आनंदाची बातमी : महापौर
नागपूर शहरात प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाला १६ जानेवारी पासून प्रारंभ होणे ही समस्त नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मकर संक्रांतीच्या पर्वावर शहराला मिळालेली ही गोड भेट आहे. मात्र,लस आली म्हणून कुणीही सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये. आपला बेजबाबदारपणा कुणाच्या जीवावर बेतू शकतो. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यानिमित्ताने केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here