Home नागपूर नागपूर मनपाची नॉयलॉन मांजाविरोधात कारवाई

नागपूर मनपाची नॉयलॉन मांजाविरोधात कारवाई

41

नागपूर : संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी दोन झोनमध्ये केलेल्या तीन कारवाईच्या माध्यमातून सुमारे तीन हजारांचा दंड वसूल केला.
प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही बेजबाबदार व्यापारी त्याची विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा व्यापाºयांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी हनुमान नगर झोनअंतर्गत दोन व आशीनगर झोनअंतर्गत एक कारवाई करण्यात आली. यात तीन हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच, ४५ नग प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आले. आतापर्यंत ३७ कारवाईच्या माध्यमातून सुमारे १,३१३ पतंगी, ११ चक्री मांजा जप्त करून सुमारे ३७ हजारांचा दंड वसूल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here