Home उपराजधानी नागपूर गांधीबाग झोनमध्ये साडेचार टन प्लॉस्टिक जप्त

गांधीबाग झोनमध्ये साडेचार टन प्लॉस्टिक जप्त

75

नागपूर : गांधीबाग झोनमधील उपद्रव शोधपथकाचे (एनडीएस) प्रमुख सुशील तुप्ते आणि त्यांच्या पथकाने ४ हजार ५०० किलो नॉन ओवेन प्लॉस्टिक कॅरीबॅग जप्त केले. यामध्ये प्रतिबंधित नॉन ओव्हन प्लॉस्टिक कॅरी बॅगच्या दहा बॅग समावेश होता. या मालाची अंदाजे किंमत साडेपाच लाख रुपये आहे. ही कारवाई आज मंगळवारी सकाळी ६ वाजून १५ मी. रियाज लॉन कळमना मार्केट जवळ करण्यात आली.
माहितीनुसार, संबंधित सर्व माल इतवारी येथील तीन नल चौकात राखी टेक्सटाईल्स येथे पाठवला जात होता. यानंतर येथूनच नागपूर शहरातील इतर भागात ही प्लॉस्टिक पुरवली जात असे. पथक प्रमुख विरसेन तांबे यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाहन गांधीबाग झोनमध्ये आणण्यात आले.
कारवाईची माहिती अप्पर आयुक्त श्री. राम जोशी आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ प्रदीप दासरवार यांना देण्यात आली. काही वेळातच गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त अशोक पाटील व झोन अधिकारी सुरेश खरे घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, प्रतिबंधित प्लॉस्टिक कॅरी बॅगने भरलेली गाडी छत्तीसगडमधील मारुती नॉन ओव्हन प्लास्टिक लिमीटेड, राजनांदगाव येथून आली होती. ही गाडी १० जानेवारीला राजनांदगाव येथून निघाली आणि १२ जानेवारीला नागपूरात पोहचताच पथकने कारवाई करीत साडेपाच लाखाचा माल जप्त केला.
दरम्यान, या कारवाईबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here