Home उपराजधानी नागपूर हा समाज कुठवर बळी घेणार, मांजामुळे तरुणाचा मृत्यू

हा समाज कुठवर बळी घेणार, मांजामुळे तरुणाचा मृत्यू

116

नागपूर : नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याने वीस तरुणाचा हकनाक मृत्यू घडवून आणण्यात आला आहे़ याप्रकरणी जबाबदार असलेल्या व्यक्तीची मांजा विके्रता आणि पतंग उडवणाºयाविरोधात कारवाईची मागणी होत आहे.

माहितीनुसार, संबंधित तरुण मंगळवारी सायंकाळी रामबाग परिसरातून दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर लटकणारा मांजा त्यांच्या गळ्याभोवती अडकला. त्यामुळे काही कळायच्या आत त्याचा गळा कापला गेला आणि यानंतरच्या उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला.

डिसेंबर महिन्यात नाशिकमध्येही दुचाकीवरून घरी जात असताना नायलॉन मांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत होऊन एका महिलेचा गाडीवरून पडून मृत्यू होता. सातपूर येथून कामावरून दुचाकीवर घरी जात असताना नाशिकच्या द्वारका पुलावर ही घटना घडली होती. याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
याशिवाय पिंपरी चिंचवडमध्ये मांजामुळे डॉक्टर तरुणीचा गाडीवरून जात असताना मृत्यू झाला होता.
दरम्यान, चिनी नायलॉन मांजा बाळगणाºयांवर आणि विकणाºयांवर औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आठ गुन्हे दाखल केल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याआधी सादर करण्यात आला आहे.