Home उपराजधानी नागपूर …अन्यथा मनपाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा

…अन्यथा मनपाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा

186

नागपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आणि जीवघेणा अपघात झाल्यास वाहनचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येतो; परंतु त्याचा काहीही दोष नसताना नायलॉन मांजामुळे वाहनचालकांचा नाहक बळी जात आहे.
अशा प्रकारांमध्ये नायलॉन मांजा विक्रेते, वापरकर्ते, पोलिस, विभाग, महानगर पालिका आदींची नायलॉन मांजावर बंदी आणण्याची संयुक्त जबाबदारी असल्याने अशा प्रकारचे जीवघेणे अपघात झाल्यास या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला जावा, अशी मागणी सामाजिक पर्यावरणवादी कार्यकर्ते [ environmenist ] आणि सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ.रवींद्र भुसारी यांनी केली आहे. मंगळवारी जाटतरोडी भागात नायलॉन मांजामुळे झालेला तरुण अभियंत्याचा मृत्यू म्हणजे मनपा आणि पोलिस प्रशासनाच्या ढिलाईचा बळी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मागील अनेक वर्षांपासून प्लास्टिक पतंग आणि जीवघेण्या नायलॉन मांजाविरोधात शहरातील अनेक पर्यावरणवादी आणि पक्षीप्रेमी संघटना सातत्याने आवाज उठवित आहेत. मात्र, केवळ कागदोपत्री कायदे आणि नियम बनवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. उपद्रव शोधपथक केवळ देखावा तर करीत नाही ना, असा संशयही डॉ. भुसारी यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here