Home उपराजधानी नागपूर वर्षा मानकर, नम्रता डहाके यांना उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार

वर्षा मानकर, नम्रता डहाके यांना उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार

104

हिंगणा (नागपूर) : स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हिंगणामधील बचत भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अंगणवाडीच्या माध्यमातून जनजागृती व जनसहभागातून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, पंचायत समिती अध्यक्ष बबनराव अव्हाले, जिल्हा परिषद सदस्य सुचिता ठाकरे, बालविकास अधिकारी बापूसाहेब चिचाने यांच्या उपस्थितीत वर्षा मानकर कोकाटे तसेच नम्रता डहाके यांना उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमात डिगडोह सर्कलच्या पर्यवेक्षिका अर्पणा तिवारी उपस्थित होत्या.