Home उपराजधानी नागपूर राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार

राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होणार

61

नागपूर : राज्यात इयत्ता पाचवी ते आठवी शाळा येत्या २७ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड [ minister varsha gaikwad ] यांनी याबाबत माहिती दिली.
इयत्ता नववी ते १२ पर्यंत वर्ग सुरू केल्यानंतर आता नव्या वर्षांत २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय घेतला आहे. यासंबंधी पालकांची सहमती आणि शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट यासंबंधी विविध एसओपी पुढील काळामध्ये आम्ही जारी करण्यात येतील
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्वर्भूमीवर यंदाचे शैक्षणिक वर्ष (सन २०२०-२१) सुरळीत सुरू झालेच नाही़ मागील डिसेंबरमध्ये इयत्ता नववी ते १२ चे वर्ग सुरू करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here