पालकमंत्र्यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

उपराजधानी नागपूर

नागपूर : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोरोना लसीकरणाचा प्रारंभ शनिवारी मनपाच्या पाचपावली स्त्री रुग्णालय केंद्रातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री नितीन राऊत आणि महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, एम्स या ठिकाणीही एकाचवेळी लसीकरण मोहिमेला [ korona vaccine programme ] सुरुवात झाली.
विभागीय आयुक्त संजीवकुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. दिलीप झळके, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मनपाच्या वैद्यकीय समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर उपस्थित होते.
पालकमंत्री नितीन राऊत यांनी फीत कापून लसीकरण मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी केली. कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी आणि लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी आशीनगर झोनच्या सभापती विरंका भिवगडे, नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे, जितेंद्र घोडेस्वार, दिनेश यादव, भावना लोणारे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन, मातृत्व आणि बालकल्याण वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मोहकर, पाचपावली स्त्री रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता बाळकोटे-खंडाईत, आरोग्य विभागाच्या समन्वयक दीपाली नागरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी उपस्थित होते.
मनपाच्या पाचपावली स्त्री रुग्णालयातील डॉ. दीपांकर भिवगडे यांनी पहिली लस घेतली. यानंतर प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता बाळकोटे-खंडाईत, नेताजी सुभाषचंद्र बोस नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा विवेकानंद मठपती, मातृत्व व बालकल्याण वैद्यकीय अधिकारी वैशाली मोहकर यांनी लस घेतली. परिचारिका राजश्री फुले आणि रजनी मेश्राम यांनी आरोग्य सेवकांना लस दिली.
सुरक्षाही…
लस घेतल्यानंतर सर्वांना अर्धा तास निगरानी कक्षात ठेवण्यात आले होते. अर्धा तासापर्यंत कुठलाही त्रास जाणवला नाही. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. घरी काही त्रास जाणवल्यास संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अथवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या.
चार दिवस लसीकरण : पालकमंत्री
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, संपूर्ण राज्यात आज लसीकरणाचा शुभारंभ झाला. नागपूर शहरात पाच केंद्रावर लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर आठवड्यातून चार दिवस लसीकरण होणार असून प्रत्येक दिवशी प्रति केंद्र १०० व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज असून लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आरोग्य यंत्रणा राहणार आहे. २८ दिवसानंतर दुसरा डोज देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, वर्षभरापासून कोरोना संक्रमणाने शहर त्रस्त झाले होते. या काळात आरोग्य सेवेतील अधिकारी-कर्मचाºयांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. मोठ्या प्रतीक्षेनंतर भारतात लस उपलब्ध झाली असून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होण्याचा अभिमान आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वच अधिकारी कर्मचाºयांचे अभिनंदन करतो, अशा भावना महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *