Home राजधानी मुंबई राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात, भीती नको, सुनील केदार यांचे आवाहन

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात, भीती नको, सुनील केदार यांचे आवाहन

46

मुंबई : राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असून भीती बाळगू नये. विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही, अशी माहिती पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार [ animal husbandary minister ] यांनी दिली. समाजमाध्यमे व इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसारित होणाºया अफवा व अकारण भीती पसरविणाºया बातम्यांपासून सावध राहण्याचे आवाहन मंत्र्यांनी केले.

यावर भर द्यावा
पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठे सोबत संपर्क टाळा. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नये तर जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवावे. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवावे. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा. पूर्ण शिजवलेले मांस खावे. आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.

हे करू नका
कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.अर्धवट शिजलेले मांस, चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.आजारी दिसणाºया सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका. टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क करावा. राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी. तसेच, पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here