Home उपराजधानी नागपूर पर्यावरणस्नेही इंधननिर्मितीवर भर द्यावा, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

पर्यावरणस्नेही इंधननिर्मितीवर भर द्यावा, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

48

नागपूर : मर्यादित नैसर्गिक स्त्रोतांचा सध्या अमर्यादित वापर होत आहे. वाहनांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही इंधनाच्या वापरात वाढ दर्शवते. शाश्वत विकासासाठी पर्यावरणस्नेही इंधननिर्मितीवर भर देण्यात यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
शनिवारी संरक्षण क्षमता महोत्सवाचे (सक्षम) राजभवन येथे डिजिटल उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

भारत पेट्रोलिअम, गॅस अथॉरिटी आॅफ इंडिया (गेल), इंडियन आॅईल कॉपोरेशन या इंधन क्षेत्रातील अग्रेसर कंपन्याकडून संयुक्तरित्या ‘हरित व स्वच्छ ऊर्जा’ या संकल्पनेवर आधारित ‘सक्षम’ अभियानात इंधन बचतीवर व स्वच्छ पर्यावरणासाठी जनजागृती होणार आहे. हा उपक्रम 15 फेब्रुवारीपर्यत चालणार आहे.
पेट्रोलियम व वायु इंधनासोबतच सौरऊर्जा, पवन उर्जेच्या वापरासाठी लोकांना प्रेरीत करण्याची गरज असल्याचे राज्यपाल म्हणाले.
भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक रवि, गेलचे कार्यकारी संचालक गौतम प्रसाद, इंडियन आॅईल कॉपोरेशनचे कार्यकारी संचालक अमिताभ अखौरी यांनी विचार व्यक्त केले. तेल उद्योग महाराष्ट्राचे राज्य समन्वयक संतोष निवेंडकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. सूत्रसंचलन श्रीमती निलिमा यांनी तर श्री.कृष्णमुर्ती यांनी आभार मानले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दीक्षाभूमीजवळील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भेट दिली. तसेच, संस्थेमार्फत चालविल्या जाणाºया अभ्यासक्रमांची माहिती घेतली.
दसाल्ट एव्हिऐशन (फ्रान्स) व कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या एरोनॉटीकल स्ट्रक्चर व इक्युपमेंट फिटर या अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेला देखील भेट दिली. कार्यशाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तत्पूर्वी संस्थेचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे संस्थेच्या विस्तृत कायार्ची माहिती दिली. कौशल्य विकास विभागाचे आयुक्त कुशवाहा यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here