Home उपराजधानी नागपूर नागपूर वाहतूक पोलिसांना मिळाले अत्याधुनिक कॅमेरे

नागपूर वाहतूक पोलिसांना मिळाले अत्याधुनिक कॅमेरे

56

नागपूर : वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेºयांची मदत होणार आहे. नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच ‘बॉडी वॉर्न’ कॅमेरे [ body warn camera ] देण्यात येतील, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

कार्यक्रमात पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सुनील फुलारी, डॉ. दिलीप झळके, उपायुक्त (वाहतूक) सर्वश्री सारंग आवाड, विनिता साहू, लोहित मतानी, गजानन राजमाने, विवेक मासाळ, अक्षय शिंदे, निलोत्पल आदी उपस्थित होते. मंत्री देशमुख म्हणाले, की वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. अशा वेळी पोलिसांनी थांबविल्यास वाद निर्माण होतो. काही वेळेस हल्लेही होतात. अशा प्रसंगी पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेºयांची मदत होणार आहे. यात रेकॉर्डिंगची सुविधा आहे. कर्तव्यावर असताना आपल्या गणवेशावर ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ लावतील. रेकॉडिंग सिस्टिम असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाºयांवर आता कडक कार्यवाही करता येईल.

पोलिस विभागामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. शहरात सद्यस्थितीत 3,688 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आगामी काळात वाहतूक पोलिसांना मदत करणारे स्वयंसेवक (ट्रॅफिक वार्डन) ही संकल्पना शहरात राबविण्यात येइल. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी घोड्यावरून गस्त घालणारे पथक सुरू करण्यात येईल. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे. कोविड लसीकरण्याच्या निमित्ताने शासकीय यंत्रणेलाच माहिती दिली जाईल, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, की ‘बॉडी वॉर्न’ मुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे सुलभ जाईल. पोलिस विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. बॉडी वॉर्न कॅमेरा म्हणजे वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान सर्व प्रसंगांना रेकॉडिंग करण्यासाठी गणवेशावर लावलेला कॅमेरा असल्याचे त्यांनी सांगितले.

संचार कम्युनिकेशन सिस्टीमचे हर्ष लाहोटी यांनी यावेळी सादरीकरण करुन बॉडी वॉर्न कॅमेºयाचे महत्त्व समजून सांगितले. निलोप्पल यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची मदत सादरीकरणाद्वारे दाखविली.
यावेळी उत्तम कामगिरी बजावणाºया वरिष्ठ पोलिस निरीक्षक आशालता खापरे, उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर, संदीप आगरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक श्री. आसिफ, हवालदार राजेंद्र देठे, पोलिस नाईक हेमंत कुमरे, प्रशांत महाजन, राजेंद्र्र गजबे, राजेश टापरे तसेच शिपाई शारदा कुल्लरकर यांना सन्मानित करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here