Home राजधानी मुंबई पदवी, पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

पदवी, पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

70

मुंबई : विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत [ minister samant ] यांनी दिली.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रवेश घेणाºया पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उमेदवारांसाठी ईडब्ल्यूएस मूळ प्रमाणपत्र, एनसीएल मूळ प्रमाणपत्र, मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र (सीव्हीसी) सादर करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना येणाºया अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेतला असून त्याचा लाभ घ्यावा. ही मुदतवाढ अंतिम असून यानंतर कोणत्याही स्वरूपाची मुदत वाढवून देण्यात येणार नाही याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी, असे
मंत्री सामंत म्हणाले.
पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व उमेदवारांनी २० जानेवारी २०२१ पर्यंत स्वत:च्या लॉगिनमधून आॅनलाईन पद्धतीने मूळ प्रमाणपत्र सादर करावी. तसेच, जे उमेदवार मूळ प्रमाणपत्र २० जानेवारी २०२१ सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करणार नाही, अशांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करुन त्यांना दुसºया फेरीकरिता खुल्या वर्गातून पात्र ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी. ज्या उमेदवारांनी वरील तीन प्रमाणपत्राकरिता अर्ज केल्याची पावती आॅनलाईन अर्ज करताना सादर केलेली आहे, अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच, पुढील सुधारित वेळापत्रक १८ जानेवारी २०२१ नंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या ६६६.ेंँंूी३.ङ्म१ॅ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.