Home आध्यात्मिक आपण कोणत्या स्पर्धेत आहोत?

आपण कोणत्या स्पर्धेत आहोत?

94

 संत राजिंदर सिंहजी महाराज

 

 

बहुतेक लोक काय करतात, आपले आयुष्य एका स्पर्धेत घालवतात. जितके शक्य आहे तितके पैसे कमवायचे. जमीन-जुमला बनवायचे, नाव आणि कीर्ती मिळवायची, सत्ता मिळवायची. ही स्पर्धा मृत्यू सोबत संपते. जेंव्हा लोक भौतिक वस्तु मिळवण्यात जीवन व्यतीत करतात, तेंव्हा एखादाच जीवनात शांती आणि समाधान प्राप्त करतो. लोक विचार करतात, एक वेळ अशी आली पाहिजे की त्यांच्या कड़े धन-संपत्ती असेल, आणि ते त्यांच्या मेहनतीच्या फळाचा उपभोग घेऊ शकतील. पण अधिकतर लोक अशी शांती प्राप्त होण्याच्या आधीच जग सोडून जातात.

हे जग एक शर्यती सारखे आहे. काही लोक ह्याला उंदीर-शर्यत म्हणतात. आपण एका चाकावर जोरात पडतो पण कुठेच पोहचत नाही. आपल्याला कळायच्या अगोदरच शिटी वाजते आणि शर्यतीची वेळ पूर्ण होते. क्वचित एखाद्याला वाटते की शांती आणि समाधान आपण सहज प्राप्त करू शकु जे आपल्या अंतरात आहे.

काय आपण आयुष्यात आत्मिक दृष्टीने शांतपणे कधी आपल्यातील अमृताच्या झऱ्याचे थोडे थेम्ब चाखण्यासाठी थोडा वेळ कधी काढला आहे का? आपल्या अंतरात आनंद, प्रेम, शांतीचे स्रोत आहेत. आपण एक क्षण थांबून आतले अमृत प्यायले आहे का? जर आपण स्थिर राहून अंतरात प्रवेश केला तर भुतलावर अस्तित्वात असलेल्या कोणत्याही खजिन्या पेक्षा मोठा आत्मिक खजिना आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तो प्राप्त करण्यासाठी शारीरिक मेहनत करायची गरज नाही. आपली दैनिक दिनचर्या आपण जगू शकतो. उदाहरणार्थ प्रामाणिकपणे आपली रोजी रोटी कमवायची, आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचा, सगळ्यां बरोबर मिळून-मिसळून वाटून खायचे, हे सगळं करत असताना सुद्धा, आपण आपल्या अंतरात शांती आणि समाधनाचा आनंद घेऊ शकतो. भौतिक संपत्ती मिळेल वा न मिळेल तसेच ती आपल्या मना प्रमाणे आनंद देईल अथवा देणार नाही हे माहित नाहि.

आपण रोज वेळ काढून ध्यान अभ्यासाला बसू या. अंतरात असलेल्या दिव्य भांडाराचे अमृत पिऊन आपण उत्स्फूर्त होऊ या. अशा प्रकारे प्रभू-प्रेमाची तहान शमेल. दैनंदिन काम काज करून प्रेम आणि शांतीपूर्ण जीवन जगूया. आपले सांसारिक कामे शांत पणे पार पडतील. ज्यामुळे आपलं आयुष्य सुंदर होईल.

*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here