Home उपराजधानी नागपूर नॉयलॉन मांजाचा वापर टाळावा : पालकमंत्री

नॉयलॉन मांजाचा वापर टाळावा : पालकमंत्री

54

नागपूर : नायलॉन मांज्याचा बळी ठरलेल्या प्रणय ठाकरे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्याचे ऊर्जामंत्री तसेच पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांत्वन केले.
५ जानेवारीला प्रणयचा इमामवाडा परिसरात नायलॉन मांज्याने गळा कापून मृत्यू झाला होता. नॉयलॉन मांजाचा वापर टाळावा. तसेच दुचाकी वाहनाने प्रवास करताना हेल्मेट वापरावे आणि गळ्यात मफलर किंवा दुपट्टा वापरावा अशा सूचना आणि विनंती करूनही घडलेली घटना ही दुर्दैवी असून मी यामुळे व्यथित झालो आहे. ठाकरे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे,असे डॉ. नितीन राऊत म्हणाले.

डॉ. नितीन राऊत यांनी आदरांजली अर्पण करून ठाकरे कुटुंबियांसोबत चर्चा केली. यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव गिरीश पांडव, माजी नगरसेविका नयना झाडे, पुष्पा भोंडे, शेषराव नगरारे, प्रकाश चवरे, नरेश यादव, रमेश बडोदेकर, रामभाऊ कावडकर, मुकेश शर्मा, शेषराव काटोले, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ़ नितीन कान्होलकर, चिटणीस डॉ. संकेत दुबे, महिला अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश अध्यक्ष प्रतिमाताई उके, वंदना चहांदे, रमेश गिरडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here