Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र पतीला ख़ांद्यावर बसवून विजयी मिरवणूक

पतीला ख़ांद्यावर बसवून विजयी मिरवणूक

102

पुणे : सोमवारी राज्यभरात लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालाचा जल्लोष अद्याप सुरू असून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका महिलेने आपल्या विजयी पतीला चक्क खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली आहे.

एखाद्या परीक्षेत वा निवडणुकीत पत्नी मोठे यश किंवा विजयी झाल्यास पती हा आनंदाच्या भरात पत्नीला खांद्यावर उचलून घेतो. मात्र, पाळू गावात पती निवडून आल्यावर झालेल्या पत्नीने अतिआनंदाने आपल्या पतीला खांद्यावर उचलून घेऊन मिरवणूक काढली. पाळू ग्रामपंचायतीमध्ये भाजपाच्या जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here