Home रानशिवार मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक : तुळस

मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक : तुळस

89

शास्त्रांमध्ये तुळस पवित्र मानली जाते. यामागे धार्मिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. घराच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये तुळशीचे रोप असते. या रोपामुळे घरातील नकारात्मक शक्ती निष्प्रभ ठरतात. तुळस वातावरणातील कीटाणू घालवण्याचे काम करते. घरातले वातावरण पवित्र राखण्यात तुळशीच्या रोपाचा मोठा हात असतो. मात्र, तुळशीचे रोपटे सुकू न गेलं, तर ते घरात ठेऊ नये. एखाद्या नदीच्या पत्रात ते सोडून द्यावे. याऐवजी तुळशीचे नवीन रोपटे घरात लावावे. सुकलेली तुळस ही वैद्यकीयदृष्ट्या फायद्याची नसते आणि अध्यात्मिकदृष्ट्याही. घरातील प्रगतीवर याचा परिणाम होऊ शकतो. नकारात्मक शक्ती वाढीस लागतात आणि घरातील शांतता बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे असे रोपटे घरात ठेवू नये. अशा रोपट्याची पूजाही करू नये.
पित्ततृषारोचक वान्तहज्य:
हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे, तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किं वा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. अनेकजण, विशेषत: हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात. त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुळशीपत्र ठेवले जाते. आयुर्वेदिय ग्रंथ सांगतात, दुर्वा कषाया मधुराश्च शीता । पित्ततृषारोचक वान्तहज्य: , तुलसी कटुका तक्ता हृद्योष्णा दाहपित्तकृत। म्हणजे दुर्वा या तुरट-गोड तर तुळ्स ही कडू-तिखट. दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण. दुर्वा पित्ततृषारोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी, तर तुळस पित्त आणि भूक वाढवणारी.
या वनस्पतीमध्ये कीटक आणि डास दूर ठेवण्याचे गुण आहेत. तुळशीचे दोन प्रकार आहेत. एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे. लहान मुलाच्या खोकल्यावर किंवा टोनक म्हणून पानाच्या रसाचा उपयोग करतात. पचनामध्ये काळ्या तुलसीचा रस पाचक म्हणून उपयोग होतो. नायटा झाल्यावर तुळशीच्या पाण्याचा रस करून त्या जागी लावतात. कानाच्या दुखण्यावर उपाय म्हणून पानाचा रस उपयुक्त ठरतो. उष्णतेच्या त्रासापासून आराम देते. तुळसीचे बी पाण्यात २ ते ३ तास पाण्यात भिजवतात. याचे दुधसाखरेबरोबर सेवन केल्यास उष्णता कमी होते. मधमाशीचा दंश झाल्यास तुळशीतील माती वापरल्यास आराम पडतो.
औषधी गुणधर्म
मूळव्याध, दम, कोरडी खरुज , कावीळ, केस गळणे, क्षयरोग अशा अनेक रोगांवर तुळस गुणकारी आहे. या गुणांमुळेच आज जगभर तुळशीवर विशेष संशोधन होत असून तुळशीच्या अर्कापासून सरप, गोळ्या आीण तेल बनवण्यात येते. तुळशीचा चहा ही निसर्गाेपचारातील एक खास निर्मिती आहे.
आपल्या अंगणात तुळशीची विपुल झाडे लावली तर त्या झाडांच्या सहवासामुळे प्रतिकार शक्ती वाढून अनेक छोट्या रोगांपासून सुरक्षित राहता येते. रोज सकाळी स्रान केल्यानंतर तुळशीच्या झाडासमोर बसून दीर्घ श्वसन केल्यास आरोग्य मिळेल. तुळशीतील या अलौकिक गुणधर्मामुळे आपल्याशी तिचा रोज संपर्क यावा म्हणून आपल्या पूर्वजांनी अनेक व्रतवैकल्यात तुळशीचा समावेश केला आहे.