Home प्रादेशिक विदर्भ भंडारा जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरण : निलंबन, बदली, सेवासमाप्ती

भंडारा जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरण : निलंबन, बदली, सेवासमाप्ती

62

भंडारा / मुंबई : जिल्हा रुग्णालयातील शिशू विभागाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले आहे.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची अकार्यकारी पदावर बदली, शिशू विभाग प्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि दोन अधिपरिसेविका आणि एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली.

या दुर्घटनेसाठी गठीत केलेल्यी चौकशी समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्या शिफारशींनुसार कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. दरम्यान या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसांत ‘हेल्थ आॅडिट केले जाणार आहे. त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल,असेही टोपे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आरोग्यसंस्थांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना पत्र देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here