वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे स्टेशन उड्डाणपूलाचे लोकार्पण

उपराजधानी नागपूर

 

नागपूर : वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या उड्डाणपूलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते आज झाले. अध्यक्षस्थानी उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत होते. शहरातील हनुमान नगरातील संत रविदास सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. गडकरी यांच्या हस्ते डिजीटल लोकार्पण करण्यात आले.

श्री. गडकरी म्हणाले की, दक्षिण नागपूरच्या विकासात या उड्डाणपूलामुळे भर पडणार आहे. तसेच वर्धा ते उमरेडच्या दळणवळणास सुकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरच्या सर्वांगीण चौफेर विकासासाठी हा उड्डाणपूल मदतगार होईल. दक्षिण व पश्चिम नागपूरची वाहतूक सोयीची होईल, असे त्यांनी सांगितले. हा उड्डाणपूल सहा पदरी असून दीड मीटर लांबीचा आहे. या पुलामुळे शहरातील वाहतुक सुकर होईल. यावेळी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी व आमदार मोहन मते यांची समयोचित भाषणे झाली.

महापौर दयाशंकर तिवारी, विधान परिषद सदस्य नागो गाणार, गिरीश व्यास, प्रविण दटके,अभिजीत वंजारी, मोहन मते, उपमहापौर मनिषा धावडे, अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, मुख्य अभियंता श्री. संजय दशपुते व कार्यकारी अभियंता दिलीप देवळे उपस्थित होते.

केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या वर्धा रोड ते उमरेड रस्त्याला जोडणाऱ्या वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे स्टेशन ( AJANI RAILWAY STATION MISSING LINK ) या 524 मीटर लांबीचा रस्ता असून यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी खर्चून वंजारी नगर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *