Home आध्यात्मिक वाचेने हिंसा : संत राजिन्दर सिंहजी महाराज

वाचेने हिंसा : संत राजिन्दर सिंहजी महाराज

58

जर आपण इतिहासाची पाने फिरवली तर आपल्याला युद्ध आणि विजयाच्या अनेक कथा सापडतील. जमीन, धन-संपत्ती, धर्म आणि राजनीतिक धोरणाने युद्धे लढली गेली. प्रत्येक वादाचे कारण भिन्न असू शकते. परंतु या सर्वांमुळे जीवनात विनाश, अति कष्ट आणि त्रास होतो. तत्ववेते आणि विचारवंत वारंवार ह्या भूतलावर येतात, जे आपल्याला समजावून सांगतात कि जीवन किती मौल्यवान आणि पवित्र आहे. ते आपल्या युगातील लोकांना हा संदेश देतात की शक्ती, संपत्ती आणि अहंकार, यातील कोणतीही एक बाब मानवी जीवनाला धोक्यात आणू शकते.

अहिंसेचे अनेक प्रकार आहेत, या अंतर्गत विचार, वचन किंवा कृती द्वारे दुसऱ्याला इजा पोहचवणे या गोष्टी येतात. अहिंसेच्या अनेक छटा आहेत, ज्याचा आपण कधीच विचारही करत नाही. दुसऱ्याला मारणं किव्हा त्याला इजा करणे हे अयोग्य आहे, हे आपण जाणतो. परंतु मनाने आणि वचनाने अहिंसेचा विचार करताना जाणवते कि आपण खूप निष्काळजी आहोत. चला तर आपण आपल्या बोलण्यातून होणाऱ्या हिंसेच्या प्रकारच्या विश्लेषण करूया आणि आपल्या उणीवा दूर करण्याचा मार्ग शोधू या.

आपल्या बोलण्याने हिंसा अनेक प्रकारे होऊ शकते. आपण कोणालाही शिवीगाळ करता कामा नये, हे आपण जाणतो. कोणाचीही चेष्टा करता कामा नये, परंतु आपण अशा गोष्टी दिवसातून बर्‍याचदा बोलतो ज्यामुळे आपला अहंकार वाढतो आणि यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जातात. जेव्हा इतर चुका करतात, तेव्हा आपण त्याचा अर्थ लावतो की तो एक मूर्ख आहे का? जेव्हा इतर चुकीची उत्तरे देतात, तेव्हा आपण त्यांना लज्जास्पद किंवा लाचार वाटेल असे वागतो. आपण लोकांच्या उणीवा शोधतो आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळतो.

बर्‍याचदा आपण इतरांवर कटाक्षाने वाघतो ,जेणेकरून इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत आणि किती बुद्धिमान आहोत, हे आपण दाखवत असतो. आपण स्वतःला बुद्धिमान तसंच हजर जवाबी आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु असे केल्याने आपण इतरांच्या भावना दुखावतो. कोणालाही हसू नये, विनोद करताना कोणाचेही मन दुखावले जाणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे.

हिंसेचे दूसरे रूप म्हणजे भेदभाव, कर्मठता. आपण पाहतो कि लोक इतर धमाबद्दल, तसेच देशांबद्दल, काळे गोरे अथवा स्त्री-पुरुष असा भेद करून त्यांच्यावर वाईट टीका करतात. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे कि आपण असे काही बोलता कामा नये, ज्यामुळे इतर लोकांचा अनादर होईल आणि आपण त्यांच्या पेक्षा वेगळे आहोत असे त्यांना वाटतं कामा नये. आपण असे काही बोलता कामा नये, जेणेकरून अन्य समाजातील व्यक्तींना वाईट वाटेल, ही महत्वाची बाब आहे. आपल्या बोलण्यातून होणाऱ्या हिंसेचा आणखी एक प्रकार म्हणजे कुटुंब, मित्र, पती पत्नी, पालक आणि मुले यांच्यात होणारी भांडणे.

दोन लोकांमधील मतभेद असणं स्वाभाविक आहे. परंतु यामुळे तंटा निर्माण होता कामा नये. मत भिन्नता असणे स्वाभाविक आहे, परंतु वाद विवादामुळे हिंसा होऊ शकते आणि दोन्ही पक्ष स्वत: च्या गोष्टी सांगण्यासाठी चिथावणी देणारे शब्द वापरतात.

आवेशात येऊन, आपण असं काही बोलून जातो जे असत्य असतं, कठोर असतं आणि केवळ समोरील व्यक्तीचे मन दुखावण्यासाठी किंवा अपमानित करण्यासाठी बोललं जातं. असं ही होऊ शकत कि आपल्या बोलण्यावर आपल्याला पश्चाताप होऊ शकतो, परंतु तो पर्यंत आघात झालेला असतो.

असे म्हणतात की जीभेची धार तलवारीच्या धारेपेक्षा धारदार असते. तलवारीची जखम बरी होते पण शब्दांची जखम सहज विसरता येत नाही. आपण काळजीपूर्वक आपले शब्द बोलले पाहिजेत. आपण शांतपणे आपली मतभिन्नता व्यक्त करणे हि चांगली बाब ठरेल. परंतु आपल्या असहमतीमुळे, आपल्यात संघर्ष होता कामा नये. आपण आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि इतरांशी नेहमीच वादविवाद करताना संयम आणि धीर ठेवला पाहिजे. जर आपण हे करू शकलो तर आपल्याला आढळेल की आपल्या सर्व समस्या प्रेमाने सोडवल्या जातील आणि या प्रक्रियेने अन्य कोणी तसेच आपणही दुखावले जाणार नाही.

*****

 

मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक : तुळस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here