Home टपोरी टुरकी ....Jocks for You * संज्या : (लाडात येऊन): माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. छावी...

* संज्या : (लाडात येऊन): माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. छावी : मग काय, माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे़ तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगासोबत भांडू शकते.

74
marathi jockes for every body...

सुलभाबाई चप्पलच्या दुकानात दोन तास वेगवेगळ्या चप्पला ‘ट्राय’ करत बसल्या होत्या.
शेवटी कशीबशी एक चप्पल त्यांना पसंत पडली
मग दुकानदाराला विचारलं, हिची किंमत किती?
दुकानदार : बाई, ही चप्पल अशीच घेवून जा…
सुलभाबाई : का बरं ? तुला पैसे नको का?
दुकानदार : बाई, तुम्ही घालून आलेल्याच चप्पला आहेत त्या.

ऐ ऽऽ डोके पे चौका…

***

बन्याची डॉक्टरसोबत चर्चा सुरू असते…
डॉक्टर राम : मी खात्री देतो की आॅपरेशन झाल्यानंतर तुम्ही चालत घरी जाऊ शकाल.
रुग्ण : म्हणजे? रिक्शापुरतेही पैसे नाही उरणार कां माझ्याजवळ?

***

पेशंट रघू : डॉक्टर, या प्रिस्किप्शनमधे तुम्ही जी औषधी लिहून दिलीत, त्यातल्या सर्वात वरच्या गोळ्या मिळत नाहीय.

डॉक्टर भालचंद्र : अहो त्या गोळ्या नाहीयेत. मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो…

***

संज्या : (लाडात येऊन): माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
छावी : मग काय, माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे़ तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगासोबत भांडू शकते.
संज्या : पण, तू तर दिवस-रात्र माझ्याशीच भांडत असतेस?
छावी : अहो, असं काय म्हणता, तुम्हीच तर माझी दुनिया, माझं जग आहात.

***

शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात.
पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो, आकर्षक साडी सेल.
तिसरा दुकानदार पाटी लावतो, जबरदस्त साडी सेल.
मग मधला दुकानदार थोडं डोकं लावत पाटी चिपकवतो … मुख्य प्रवेशद्वार..

*****