Home उपराजधानी नागपूर शिबीर कार्यालय सुरु झाल्यामुळे कामाला गतीशिलता येणार : पालकमंत्री

शिबीर कार्यालय सुरु झाल्यामुळे कामाला गतीशिलता येणार : पालकमंत्री

68

नागपुर : नागपुरात हिवाळी अधिवेशन काळात पोलीस महासंचालक शिबीर कार्यालय सुरु राहायचे. इथे, कायमस्वरुपी कार्यालयाची इथे गरज होती. आता हे कार्यालय सुरु होत असल्यामुळे त्याचा आनंदही आहेच. शिवाय कायदा व सुव्यवस्थेसह प्रशासकीय कामामध्ये गतीशिलता येणार आहे. प्रत्येक कामासाठी मुंबई येथे जाण्याची गरज राहणार नसल्याचा विश्वास पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ energy minister niteen raut ] यांनी व्यक्त केला.

कार्यालयाचे बांधकाम जवळपास दोन एकर परिसरात झाले असून, ते 13 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मागणीनुसार पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत इमारतीत कोरोना क्वारंटाईन केंद्र बंद करुन ते पोलिसांसाठी देण्यात येणार आहे. तथापि, तेथील आरटीपीसीआर केंद्र यापुढेही सुरु राहणार असल्याचे पालकमंत्री श्री. राऊत म्हणाले. पोलीस दल वादळ-वाऱ्यात, उन्हा-पावसात आणि सणासुदीच्या दिवसातही अहोरात्र सेवा बजावतात. त्यांना निवारा मिळावा, यासाठी या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारत परिसरात मोठा हॉल बांधण्यात येणार असून, विविध कार्यक्रम करता येणार असून, येथे वाचनालयाचीही निर्मिती करण्यात येणार आहे. कोरोनाकाळात पोलिसांनी उत्तम जबाबदारी पार पाडली असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पोलीस गृहनिर्माण संस्थेचे कार्याची माहिती देत हिंगणा, हुडकेश्वर, इमामवाडा, नवीन कामठी येथील पोलीस ठाणे आणि निवासस्थानांच्या बांधकाम सुरु असल्याचे सांगितले. राज्यात 2 लाख 20 हजार पोलीस कार्यरत असून, त्या तुलनेत अत्यंत कमी घरे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख हे 70 हजारावर पोलिसांना निवासस्थाने देण्याचा प्रयत्न करतील, असा आशावाद श्री.नगराळे यांनी व्यक्त केला. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री डॉ.नितीन राऊत आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते सहायक फौजदारआणि पोलिस कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात निवासस्थानांची चावी देत वाटप करण्यात आले.