Home उपराजधानी नागपूर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झालेल्या नागपूरच्या श्रीनाथ अग्रवाल यांचा पालकमंत्री डॉ.नितीन...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झालेल्या नागपूरच्या श्रीनाथ अग्रवाल यांचा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केला गौरव

52

 

नागपूर : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नागपूरच्या श्रीनाथ अग्रवाल यांची इनोव्हेशन कॅटेगिरी अंतर्गत निवड झाली आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांच्या पुण्यतिथीला श्रीनाथ अग्रवाल यांच्या निवासस्थानी जाऊन बाल वैज्ञानिकांचा गौरव केला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ याअंतर्गत दरवर्षी विविध क्षेत्रात केलेल्या संशोधनाबद्दल देशातील बाल वैज्ञानिकांचा बालशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात येतो. यावर्षी 32 बालकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नागपूरच्या चंदादेवी सराफ विद्यालयात श्रीनाथ अग्रवाल यांनी दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण प्राप्त करीत देशात तिसरे स्थान पटकाविले आहे.भविष्यात विज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा मानस श्रीनाथने बोलताना व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here