बाभुळगांव (यवतमाळ) : देशाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मंगळवारी तालुका काँग्रेस अध्यक्ष तसेच कृउबासच्या संचालक प्रीती अविनाश वानखडे यांच्या उपस्थितीत बाभुळगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
अन्य एका कार्यक्रमात बाभुळगांव तालुका खरेदी-विक्री संघ मर्यादित येथे अध्यक्ष श्रीकांत कापसे यांच्या हस्ते प्रीती अविनाश वानखडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.