Home उपराजधानी नागपूर मुख्यमंत्र्यांची नागपुरात विरोधकांवर चांगली फटकेबाजी

मुख्यमंत्र्यांची नागपुरात विरोधकांवर चांगली फटकेबाजी

61
     वाहनातून जंगल सफारी
     मोबाईलमध्ये वाघ कैद

CM THAKARE IN NAGPUR : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज नागपुरात बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे लोकार्पण केले. तसेच, जंगल सफारी करत विरोधकांवर चांगली फटकेबाजीही केली.

आपले महाविकास आघाडीचे सरकार यापुढे प्रत्येक पाऊल एवढ्या मजबूतीने आणि आत्मविश्वासाने टाकेल की ‘वाघ आला रे वाघ आला’ म्हटले तरी विरोधकांची दाणादाण उडाली पाहिजे. असा विकास आणि प्रगती आपल्या सगळ्यांच्या आशीवार्दाने लवकरात लवकर जिथे जिथे करणे शक्य आहे, तिथे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वाघासारखा स्वभाव असला पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आहे की, जगायचे तर वाघासारखे जगायचे, शेळी-मेंढीसारखे नाही. म्हणून शिवसेनेचा ‘सिम्बॉल’ वाघ घेतलेला आहे आणि त्या वाघाला साजेसे काम जर आपण केले नाही तर नुसत्या घोषणा देण्यात काय अर्थ आहे, असेही ते म्हणाले.

गोरेवाडा प्रकल्पाचे लोकार्पण करताना ज्यांचे ज्यांचे हातभार या प्रकल्पाला लागले त्यांना मी धन्यवाद देतो. एका अतिशय चांगल्या प्रकल्पाचे माझ्या हातून लोकार्पण झाले आहे. मी सुद्धा स्वत:ला भाग्यवान समजतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो, असेही मुख्यमंत्री भाषणाच्या शेवटी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here