Home उपराजधानी नागपूर विदर्भात वन, वन्यजीव पर्यटनसोबतच खाण पर्यटनाला प्रचंड संधी

विदर्भात वन, वन्यजीव पर्यटनसोबतच खाण पर्यटनाला प्रचंड संधी

86

नागपूर : पर्यटन हे विदर्भाचे ग्रोथ इंजिन असल्याचे स्पष्ट केले. प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समर्पक असून ठाकरे कुटुंबियांनी आपल्या आजोळ असणाऱ्या विदर्भाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे. विदर्भात वनपर्यटन वन्यजीव पर्यटन सोबतच खाण पर्यटनाला प्रचंड संधी आहे. नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी असणाऱ्या खाणीमध्ये हे पर्यटन सुरू झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटकांना नवे आकर्षण निर्माण होईल. नागपुरातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प तातडीने पूर्णत्वास जावा. गोरेवाडा येथील दोन्ही प्रकल्प जोडण्यासाठी ओव्हरब्रीज करण्यात यावा. समृद्धीच्या मार्गाने विदर्भाचा विकास व्हावा अशी, अपेक्षा डॉ. नितीन राऊत [ energy minister niteen raut ] यांनी व्यक्त केली.

श्री. आदित्य ठाकरे यांनी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दहा संरक्षित अभयारण्य जाहीर करण्यात आले आहे. नागपूर सभोवताल असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणात पर्यटक आकर्षित होत आहे. त्यामुळे नागपूर ही खऱ्या अर्थाने देशाची वन राजधानी असून त्यादृष्टीने येथील प्रकल्पाला चालना देण्यात येत आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान निर्मितीसाठी वन विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना विकास, वन आणि पर्यावरण यांची सांगळ घालून साकारलेला हा देशातील एकमेव प्रकल्प असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, वाघाचे संवर्धन करण्यासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी व्याघ्र प्रकल्प ही संकल्पना राबविण्यात सुरुवात केली. विदर्भातील सात प्रकल्पामुळे वाघाच्या संख्येतही सातत्याने वाढत होत आहे. त्यामुळेच नागपूरला ह्यटायगर कॅपीटलह्ण म्हूणन नवी ओळख मिळाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताल राहणाऱ्या आदिवासींना वनीकरणाच्या कामांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे वन विभागाने आदिवासींना वनीकरणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशी सूचना यावेळी केली.

श्री. सुनील केदार म्हणाले, नागपूर शहराच्या तसेच विदर्भाच्या विकासाला गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून रोजगाराच्या तसेच पर्यटनाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीनेही नागपूरकरांसाठी शहराचे हृदय असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्वात मोठे वन्यप्राण्यावरील उपचारासाठी गोरेवाडा येथे केंद्र सुरु झाले असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

 

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांचे चार विदर्भ दौरे, चार आशय आणि एक सूत्र !

शासनाच्या विविध शब्दकोशांमुळे मराठीचा भाषा व्यवहार समृध्द : माहिती संचालक हेमराज बागुल