Home उपराजधानी नागपूर बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान दोन वर्षात पूर्ण

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान दोन वर्षात पूर्ण

55

नागपूर : बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान प्रकल्पाच्या निर्मितीसाठी ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाने शंभर कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्यामुळे पहिल्या टप्प्यातील इंडियन सफारीचे उद्घाटन होत आहे. उर्वरित निधी तातडीने मिळाल्यास हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल, असे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान या प्रकल्पाच्या नामकरणासंदर्भात आदिवासी समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथे सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन येथे येणाऱ्या पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी गोंडवाना थीम पार्क हा प्रकल्प पूर्ण करण्यास मंजूरी द्यावी, असे श्री. राठोड यांनी सांगितले.

वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले, मानव आणि वन्यप्राणी यातील संघर्ष कमी करण्यास आम्ही प्राधान्य दिले असून वन व पर्यावरणाचे विकासासाठी घेतलेल्या निर्णयामुळे गोरेवाडासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना मिळाली आहे. शासनाच्या या धोरणामुळे वन विभागाला नवी ओळख मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी प्रास्ताविक, कार्यक्रमाचे संचलन श्वेता शेलगावकर यांनी केले. मुख्य महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here