Home उपराजधानी नागपूर पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते वराडा आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते वराडा आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

57

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथील वराडा उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. तसेच आमडी उपकेंद्राचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, सभापती मनोहर कुंभारे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमल किशोर फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदी यावेळी उपस्थित होते.

ग्रामस्थांना गावातच वेळेवर वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी प्रत्येक उपकेंद्राला सर्व सुविधायुक्त इमारत, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. ग्रामीण भागामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी रुजविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले. पारशिवनी पंचायत समितीच्या सभापती मीना कावडे, रामटेक पंचायत समितीच्या सभापती कलावती ठाकरे, आमडीच्या सरपंच शुभांगी भोसकर, वराडाच्या सरपंच विद्या चिखले तसेच आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, गावकरी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुधाकर जुनघरे तर आभार राजू भोसकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here