गृहमंत्री म्हणाले, नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी राज्य शासन पोलिस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे

विदर्भ

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी राज्य शासन पोलिस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

मंत्र्यांनी गुरुवारी गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथील प्राणहिता पोलिस मुख्यालयाला भेट देऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलिस अधिकाºयांशी संवाद साधून विविध शस्रास्त्रे आणि बुलेटप्रूफ व्हॅनची पाहणी केली. त्यानंतर गडचिरोलीतील पोलिस मुख्यालयाला भेट देऊन शौर्यस्थळाची पाहणी केली.
मंत्र्यांनी नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागात आजतागायत केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले. शौर्यपदक प्राप्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाºयांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *