Home टपोरी टुरकी ....Jocks for You मन्या: शेरू, कानात बाळी केव्हापासून घालायला लागलास? शेरू : बायको माहेरी जाऊन...

मन्या: शेरू, कानात बाळी केव्हापासून घालायला लागलास? शेरू : बायको माहेरी जाऊन आल्यापासून…Tapori Turaki

107
marathi jockes for every body...

काल सायंकाळी मी ज्योतिषाकडे गेलो.
ते म्हणाले, ‘‘बाळा तू खूप शिकणार आहेस़’’
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळेना़ मग तो काय म्हणाला,‘‘बाळा, हसतोस काय? काय झालं काय?’’
.
.
.
मी बोललो,‘‘काका,मी खूप शिकणार हे खरंय; पण पास कधी होणार ते सांगा की…’’

***

भरत्या जोराजोरात आणि तावातावातही बोलत होता़
…ते,नव्हे,मी काय म्हणतोय ? त्या बुलेट ट्रेनमध्ये विनातिकिट सापडलं तर कसं!
मित्र : तर काय?
भरत्या बेंबीला गाठ मारून बोलला, तर आपल्याला भारतातल्या जेलमध्ये ठेवणार का जपानला हाकलणार?
काही दिवसांपासून भरत्या पासपोर्टच्या कार्यालयाभोवती फेºया मारतोया…

***

मला एक कळत नाही की, श्रीमंत मित्रांच्या बरोबर मैत्री केली तर आपण श्रीमंत होत नाही !
सेम तसंच़़़
हुशार मित्रांच्या बरोबर मैत्री केली की आपण हुशार होत नाही! पण…
दारूड्या मित्राबरोबर मैत्री केली की आपण पण दारूडे कसे होतो?

***

दिन्याची बे्रकिंग न्यूज अशी होती, जर आपण सहकुटुंब कुठे फिरायला गेलात तर आपले तिथले फोटो फेसबुक व्हाट्सप वर टाकू नये. त्यामुळे जे कधी कुठे जात नाही ते घरातून बाहेर होतात.

***

मुंबईकर : तुम्ही उकडत असल्यास काय करता ?
पुणेरीकर: आम्ही कूलरसमोर बसतो!
मुंबईकर: तरीही उकडत असेल तर…
पुणेकर : मग आम्ही कूलर चालू करतो…

***

मास्तरनं इंग्रजीच्या तासाला बन्याला थेट विचारलं, व्हाट ईज लाईफ सायकल?
बन्या : सर, मी सांगतो़ (बाह्या सरकवत) सायकलचे पायडल मार मार मारून थकलो की आपण फटफटी घेता़े फटफटीनं हौस भागवली की मग कार घेतो़ कारमधून फिरून फिरून आपली ढेरी वाढली की मग आपण ‘जिम’ लावतो़ मग तिथं जिमवाले आपल्याला सायकल चालवायला देते़ पुन्हा आपण सायकलवर येतो़ यालाच म्हणतात, लाईफ सायकल!

***

भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला !
रमाकाकू : हे घे …हाजमोला.
.
.
.
भिकारी : साहेब, एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये.
.
.
.
भिकारी: च्यायला, उद्या उद्या म्हणता, या कॉलनीत माझे हजारो रुपये अडकलेत!

***

मन्या: शेरू, कानात बाळी केव्हापासून घालायला लागलास?
शेरू : बायको माहेरी जाऊन आल्यापासून…
मन्या : वहिनींनी आणली का माहेरावरून ?
शेरू : ती कसली आणते! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली. ती माझीच आहे, असं सांगितल्यापासून कानात घालतोय.

*****

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here