Home राजधानी मुंबई गुजराती अभिनेते अरविंद जोशी यांचे निधन

गुजराती अभिनेते अरविंद जोशी यांचे निधन

66

मुंबई : गुजराती चित्रपटांतील अभिनेते, दिग्दर्शक अरविंद जोशी शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास निधन झाले़ ते अभिनेता शर्मन जोशीचे वडील यांचे वडील होत.
अरविंद जोशी वृद्धापकाळात अनेक आजारांनी ग्रस्त होते. मुंबईच्या जुहू येथील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 84 वर्षांचे होते.
अरविंद जोशी यांनी अनेक हिट गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. नाटकांमध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांची विशेष ओळख होती.
याशिवाय हिंदीतील अपमान की आग, खरीदार, ठिकाणा, नाम ( 1987), इत्तेफाक, शोले यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, हिंदी मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.