Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र शक्ती फौजदारी कायदे विधेयक बाबत संयुक्त समितीची बैठक

शक्ती फौजदारी कायदे विधेयक बाबत संयुक्त समितीची बैठक

66

औरंगाबाद : गृहमंत्री अनिल देशमुख [ Home Minister Anil Deshmukh ] यांच्या अध्यक्षतेखाली सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक-51 शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020 यावरील संयुक्त समितीची महिला संघटना आणि औरंगाबाद खंडपीठाच्या तसेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या वकील संघटनांच्या प्रतिनिधी समवेत आज बैठक पार पडली.
यावेळी सर्वश्री विजय उर्फ भाई गिरकर, आमदार विनायक मेटे, अमोल मिटकरी, सुरेश वरपूडकर तसेच महिला आमदार श्रीमती माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मनीषा चौधरी, श्वेता महाले, डॉ.भारती लव्हेकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, निधी व न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र्र गुरव, विधी व न्याय विभागाचे अवर सचिव सुभाष नलावडे उपस्थित होते.

यावेळी पुढील महिला संघटनांनी अभिप्राय व सूचना संयुक्त समितीपुढे मांडल्या. निशा शिवूरकर, डॉ. अपर्णा कोत्तापल्ले, प्रा. भारती भांडेकर विश्वास,ज्योती पतकी, श्रीमती आसमा शेख, प्रिया गोंधळेकर, सय्यदा नुझहत बेगम, स. इमरान अली, श्रीमती अश्विनी लखमले, दीपक लखमले, लक्ष्मणराव देशमुख, श्रीमती ममता मोरे, चंद्रकांत सोनवने, तन्मय सोनवणे, रेणुका घुले, अप्पासाहेब उगले, श्रीमती अन्नपूर्णा ढोरे, श्रीमती मोहिनी निकम, श्रीमती छाया घाटे, श्रीमती जया पाईकराव, आप्पासाहेब गायकवाड, श्रीमती संगिता गायकवाड, श्रीमती ज्योती शेजुळ, डॉ. रश्मी बोरीकर, श्रीमती सुरेखा पंडितराव महाजन, अनुराधा मंत्री, श्रीमती अनघा कुलकर्णी, श्रीमती पूजा बनकर, विलास केसरचंद पाटनी, संदीप शिरसाट, सिंधू भोळे, रंजन कडेठाणकर.