Home नागपूर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभर अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभर अभिवादन

25

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज 73 वा स्मृतीदिन आहे. [ Mahatma Gandhi Death Aniversary ] त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतील राजघाट या गांधीजींच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. हुतात्मा दिनानिमित्त देशभरात दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी, सैन्यदलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदलप्रमुख ?डमिरल करमबीर सिंग आणि वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनीही महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर पुष्पांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विटर संदेशाच्या माध्यमातून गांधीजींना श्रद्धांजली वाहिली आहे. तत्पूर्वी या सर्वांनी ट्विटरच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली वाहिली. गांधीजींच्या शांतता, अहिंसा, साधेपणा, मानवता या आदर्शांचा सर्वांनी अंगीकार केला पाहिजे असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. गांधीजी शांतता, अहिंसा आणि निस्वार्थ सेवाभावाचे मूतीर्मंत उदाहरण होते. आपले विचार आणि कृती यातून त्यांनी काळाच्या पटलावर आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्यांनी समाजातील मागास, दलित घटकांच्या उद्धारासाठी अथकपणे काम केले असे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. बापूंचे आदर्श लाखो लोकांना प्रेरणा देणारे आहेत. हुतात्मा दिनी आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या सर्वांच्या त्यागाचे स्मरण केले पाहिजे अशा शब्दांत पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधींजींनी सत्य, अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्काचा लढा लढला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचे कल्याण आहे ही त्यांची शिकवण होती. खेडी स्वयंपूर्ण झाली तरच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीजी ही केवळ व्यक्ती नसून मानवकल्याणाचा, विश्वकल्याणाचा विचार आहे. हा विचार अमर आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधींजींच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेच्या रक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाºया शहीद वीरांचे स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनाही हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केले.

हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली
मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त [ Hutatma Din ] राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल आणि प्राची जांभेकर तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन केले.

सर्वोदय आश्रमात आदरांजली
नागपूर : हुतात्मा दिनी सर्वोदय आश्रम धरमपेठ येथे गांधीवादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सामूहिक सर्वधर्म प्रार्थना गायली गेली.
कार्यक्रमास डॉ. प्रकाश पाटील, अ‍ॅड. वंदन गडकरी, डॉ. रविंद्र भुसारी, संदेश सिंगलकर, डॉ.पंकज कन्नमवार, अ.रा.देशपांडे, गोविंदराव खापरे, अ‍ॅड. प्रिया शाहू, खुमन बन्सोड प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here