जयंत पाटील म्हणाले, हातावर घडी घालून बसू नका

विदर्भ

भंडारा : सत्तेत आलो म्हणजे हातावर घडी घालून बसू नका. आपली बांधिलकी जनतेशी असून ती अधिकाधिक मजबूत करण्याचे काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील [ Jayant Patil ] यांनी केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौºयाचा [ Rashtrawadi Pariwar Samwad ] शनिवारी तिसरा दिवस होता. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीने दौºयाची सुरुवात झाली.

भंडारा येथील प्रश्नांची सोडवणूक करून लोकांना आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांकडे आकर्षित करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाती घ्यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. दुर्गम भागातही लोक रात्री उशिरापर्यंत आढावा बैठकांना उपस्थित राहत आहेत. या परिवाराचा आणखी विस्तार होणे असल्याचे ते म्हणाले. खासदार प्रफुलभाई पटेल यांनी धानाला जास्तीची किंमत मिळवून दिली आहे. अतिवृष्टीने शेतकºयांना झालेल्या नुकसानीची भरपाई राष्ट्रवादीने शासनाच्या माध्यमातून मिळवून दिली याची आठवण जयंत पाटील यांनी यावेळी करून दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री विलासभाऊ शृंगारपवार, माजी आमदार राजू जैन, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, पक्षाचे नेते धनंजय दलाल, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राजेंद्र बढिये यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *