Home प्रादेशिक विदर्भ एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहरांचा विकास आणि घरे स्वस्त होतील 

एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीमुळे शहरांचा विकास आणि घरे स्वस्त होतील 

40

गडचिरोली : पालकमंत्री एकनाथ शिंदे [ eknath shinde in gadchiroli ] यांनी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची आढावा बैठक काल जिल्हा नियोजन सभागृहात घेतली. यावेळी संपूर्ण राज्यात ऐतिहासिक निर्णय घेऊन लागू करण्यात आलेल्या एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) चे सादरीकरण झाले.

पालकमंत्री म्हणाले, या एकत्रित विकास विकास नियंत्रण नियमावलीमुळे सर्व शहरांचा विकास सारख्या पद्धतीने होण्यास चालना मिळेल व यामुळे सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे स्वस्त होतील. गेल्या अनेक वषार्पासून हा विषय प्रलंबित होता. गडचिरोली मध्ये यावेळी माहिती देण्यासाठी व उपस्थितांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वत: प्रधान सचिव, नगर विकास महेश पाठक पालकमंत्री यांचे समवेत आले होते.

नवीन नियमावलीमुळे एफएसआइचा गैरवापर आहे तो थांबेल, मोठ्या प्रमाणावर एफएसआइ दिल्यामुळे हौसिन्ग स्टॉक मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल. घरांच्या किमती नियंत्रणात येतील, परवडणारी घरे लोकांना मिळतील, त्याचबरोबर पंधराशे स्क्वेअर फुटापर्यंत स्वत:चं घर बांधायचं असेल तर त्यामध्ये कुठल्याही परवानगीची आवश्यकता नाही. तीन हजार स्क्वेअर फूट पर्यंत घर बांधायचं असेल तर दहा दिवसांमध्ये परवानगी देणे बंधनकारक केले आहे असे सादरीकरणात मांडण्यात आले. सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून युनिफाईड डीसीआर चा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे असे उद्गार पालकमंत्री यांनी यावेळी काढले. त्यामध्ये कृषी पर्यटनाला देखील चालना दिलेली आहे. शेतकरी असेल तर त्याला स्वत:चा रोजगार निर्माण करायचा असेल तर 0.2 FSI होता तो 1 FSI पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हॉटेल किंवा रिसॉर्ट जे करायचे ते त्यांना करता येईल. शेतकऱ्याच्या पर्यटनाला देखील स्टार ग्रेड हॉटेल आहेत त्यांना देखील तीन पर्यंत एफएसआय दिला आहे. म्हणजेच युनिफाईड डीसीआर मुळे परवडणारी घरे मिळतील, गैर व्यवहार होणार नाही, सर्वसामान्य माणसाला परवडणारे घरे मिळेतील त्याच बरोबर कृषी आणि पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. भविष्यामध्ये या युनिफाईड डीसीआरचा फायदा शहराच्या विकासासाठी, राज्याच्या सुनियोजित विकासासाठी आणि नगरपालिका, महापालिका, नगरपरिषदा यांच्या देखील उत्पन्नामध्ये यामुळे भर पडेल अशा प्रकारच्या युनिफाईड डीसीआरचा निर्णय मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागाने घेतला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी संगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here