मुंबई : बाहुबली फेम प्रभास आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आदिपुरुष’ [ aadipurush movie ] चित्रपटाच्या सेटला भीषण आग लागली आहे.
माहितीनुसार, हा स्टुडिओ मुंबईतील इनआॅरबीट मॉलजवळ आहे. सेटवरील आगीच्या ज्वाला पाहता आगीत सेटचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी सुखरुप आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. लोकमत 18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे.