मुंबई : समाजमाध्यमांवर येणाºया ‘फ्री गिफ्ट’ तसेच ‘फ्री कूपन’च्या लिंक व्हायरल होऊ लागल्या आहेत. अशा कोणत्याही लिंक्सवर क्लिक करू नये, अशा लिंकवर आपली वैयक्तिक माहिती देवू नये, असे आवाहन मुंबई सायबर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले आहे.
मुंबईतलं ताज हॉटेल फ्री कूपन, तसेच फ्री गिफ्ट कार्ड देणार असल्याबाबतचीही एक लिंक व्हायरल झाली होती. मात्र, ही लिंक बनावट असल्याचे आणि संबंधित वृत्त खोटे असल्याचे ताज हॉटेलने स्पष्ट केले असून आकाशवाणीने यासंबंधी वृत्त दिले आहे.