Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात

61

पुणे : पुण्यात काल संवाद आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी [ bhimsen joshi ] यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात करण्यात आली.

पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर ४० वर्षे साथसंगत करणारे ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांचा विशेष सत्कार विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात अभ्यंकर यांनी पंडित भीमसेन जोशी यांनी संतवाणीद्वारे संपूर्ण जगाला ब्रह्मानंद दिल्याचे सांगितले. पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास आणि विराज जोशी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि संगीताच्या विविध पैलूंवर रचलेल्या रचनांचे सादरीकरण केले.

दरम्यान, आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने येत्या 6 आणि 7 फेब्रुवारीला ‘अभिवादन’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात संगीताच्या मैफली तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. दरम्यान, भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here