मुंबई महानगरपालिका शिलकी अर्थसंकल्पात ‘मुंबई पार्किंग अथॉरिटी’ स्थापन करण्याचा प्रस्ताव

राजधानी मुंबई

मुंबई : शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी ‘मुंबई पार्किंग अथॉरिटी’ स्थापन करण्याच्या प्रस्तावासह मुंबई महापालिकेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी शिलकी अर्थसंकल्प आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प ३९ हजार ३८ कोटी रुपयांचा असून, गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा तो सुमारे 16.75 टक्क्यांनी जास्त आहे.

कोरोना संकट काळात महापालिकेला मदत करणाºया हॉटेलांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. कोविड काळात काम करताना निधन झालेल्या कोविड योद्धा पालिका कर्मचाºयांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्याची तरतुदही प्रस्तावित आहे.

आरोग्य सुविधांसाठी ४ हजार ७२८ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद असून १०८ नवी सार्वजनिक शौचालयं बांधण्याचा प्रस्ताव आहे़ यासाठी ३२३ कोटी २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. कोस्टल रोडसाठी २ हजार कोटी ७ लाख रुपयांची तरतूद यात केली आहे.

‘मुंबई पार्किंग अथॉरिटी’ [ mumbai parking authority ] ही नवी यंत्रणा रस्ते आणि वाहतूक विभागाअंतर्गत काम करेल. वाहतूक, शहरी नियोजन, धोरण संशोधक इत्यादी क्षेत्रातील कुशल कर्मचाºयांचे पथक प्राधिकरणाला सहाय्य करेल. यासाठी 1,600 कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *