Home राज पाट विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर पटोले म्हणाले…

विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर पटोले म्हणाले…

109

मुंबई : काँग्रेस नेता नाना पटोले [ Nana Patole ] यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यांची वर्णी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी लागणार असल्याची माहिती आहे. विधानसभाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.

नाना पटोले यांनी बुधवारी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आला होता. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, या घडामोडीनंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यानंतर मी त्याचे पालन केले आहे. मी मंत्रिपदाची किंवा इतर कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही.
दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचे होते, ते आता खुले झाले आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.