Home उपराजधानी नागपूर महापौर म्हणाले, भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न व्हावा

महापौर म्हणाले, भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न व्हावा

61

नागपूर : शहरातील पावसाळी नाल्या बुजल्या असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचते. या पाण्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी होऊ शकेल का, याचा विचार व्हावा. ते शक्य असेल तर प्रस्ताव तयार करून पावसाळ्यापूर्वी त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

यासंदर्भात मनपा [ Nagpur Municiple Corpaoration  ] मुख्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, राजेश भूतकर, अविनाश बाराहाते, गिरीश वासनिक, धनराज मेंढुलकर, अनिल गेडाम, श्री. गुरुबक्सानी आदी उपस्थित होते.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी पावसाळी नाल्या अनेक ठिकाणी जोडल्या नसल्याची बाब अधिकाºयांच्या लक्षात आणून दिली. या नाल्या जोडल्या नसल्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचून राहते. या पाण्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी होऊ शकतो का, त्याचा अभ्यास करून शक्य असल्यास तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सेंट्रल एव्हेन्यूवरील वाहनतळांच्या ठिकाणी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’करून रस्त्यावर साचणारे पाणी तिकडे वळून ते जमिनीत टाकता येईल का, त्याचीही चाचपणी करण्यास त्यांनी सांगितले. उद्यानांच्या बाहेर साचणाºया पाण्यालाही उद्यानात वळवून तेथील भूजल पातळी वाढविण्यावर विचार व्हावा जेणेकरून परिसरातील बोरवेल, विहिरी आदींची पाणी पातळी वाढेल, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सूचित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here