Home सिनेदीप ‘चमत्कारी बाबा’ राजेंद्र कडकोळ यांचे निधन

‘चमत्कारी बाबा’ राजेंद्र कडकोळ यांचे निधन

59

पुणे : ‘चमत्कारी बाबा’ अशा भूमिकेतून मोठी प्रसिद्धी मिळालेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे गुरुवारी दुपारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले.
राजेंद्र कडकोळ यांनी अनेक चित्रपटात अभिनय केला असून ‘झपाटलेला’मधील मांत्रिकाची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली होती.

महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटातील तात्या विंचू आणि ‘ओम फट् स्वाहा’ हा मृत्युंजय मंत्र देणारा बाबा चमत्कार आठवतो. दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांचीही यात भूमिका होती.

दरम्यान, कडकोळ यांनी कृष्णधवल चित्रपटापासून आपली कारकीर्द सुरू केली. रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here