Home राष्ट्रीय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दर जैसे थे

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दर जैसे थे

69

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो आणि रिव्हर्स रेपो दर जैसे थे ठेवायचा निर्णय आज जाहीर केला. यानुसार रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३ पूर्णांक ३५ शतांश टक्क्ंयावर कायम आहे. रिझर्व्ह बँकेंच्या पतधोरण समितीने
शुक्रवारी झालेल्या बैठकीत पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेतला, त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे [ R B I ] गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.

चालू आर्थिक वर्षासह, पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होऊन, विकासाचा वेग वाढता राहावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०२१-२२ या आर्थिक वर्षात स्थूल उत्पादन वाढीचा दर १० पूर्णांक ५ शतांश टक्के राहील असा अंदाजही आरबीआयने व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या या अखेरच्या तिमाहीत महागाईचा दर ५ पूर्णांक २ शतांश टक्के असल्याचेही दास यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here