भंगार गोदामाला भीषण आग, आकाशात नुसते धुराचे लोळ

राजधानी मुंबई

मुंबई : मानखुर्दच्या मंडल परिसरातील एका भंगाराला आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे. माहितीनुसार, ती विझवण्यात अद्यापही यश आलेले नाही.

घटनास्थळी लाकूड आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या वखारी आहेत. त्यामुळे आगीचा भडका अधिकच उडत आहे. ज्या परिसरात आग लागली आहे. त्याठिकाणी रहिवाशी लोकांची वस्तीदेखील आहे. नेमकी आग [ mankhurd fire ] कशामुळे लागली त्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजता आग लागली. याठिकाणाहून धुराचे लोळ बाहेर येत असल्याने परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दिली. यानंतर तत्काळ आग विझवण्याचे काम सुरू झाले; परंतु कालांतराने आगीचा भडका अधिकच उडाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *