टपोरी टुरकीचा हा जोक वाचला काय…

टपोरी टुरकी ....Jocks for You

एकदा एक गाढव दोन फुटांच्या दोरीला बांधलेले असते…
आणि त्याला सहा फुटांवरचे गवत खायचे असते,
मग सांगा बरं,तो ते गवत कसं खाईल?
.
.
.

मानली ना हार…! सांगतो, त्या गाढवानं पण अशीच हार मानली होती.

***

पिंकी : आमच्या कॉलेजमधली मुलं माझ्या एका-एका श्वासावर
मरतात…
.
.
.

बंटी : मग तू चांगली टूथपेस्ट का नाही वापरत? गधडे, नुसतं पाप करतेस…

***

नवरा थकलेला आणि रागात आॅफिसमधून घरी आलेला असतो…
नवरा : प्यायला पाणी आणं गं.
बायको : तहान लागली आहे का ?
.
.
.

नवरा (संतापून) : नाही, माझा गळा कुठून लींक होतोय, ते
तपासून घेतो.

***

लग्नाच्या दिवशी नटून थाटून फिरणाºया मुलींना पाहून
नवरदेवाच्या मनात एक प्रश्न पडत असतो.
.
.
.
कालपर्यंत ह्या बया सगळ्या कुठल्या बिळात दडल्या होत्या…

***

काल सायंकाळी मी ज्योतिषाकडं गेलो.
ते म्हणाले, बाळा तू खूप शिकणार आहेस.
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळेना़ मग तो म्हणाला, हसतोस का तू? काय झालं काय?
.
.
.
मी म्हणालो, काका़ मी खूप शिकणार हे खरंय. मलाही ते माहित आहे; पण पास कधी होणार,तेवढं सांगा की…

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *