Home उपराजधानी नागपूर नागपुरात विविध भागातील विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपुरात विविध भागातील विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

59

नागपूर : उत्तर नागपुरातील नागरी दलित वस्ती सुधार योजना सन 2019-20 अंतर्गत नारी मानव नगर यासह येथील विविध वस्त्यांमधील सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ Energy Minister Niteen Raut  ] यांच्या हस्ते आज झाले. यावेळी नगरसेवक स्नेहा निकोसे, दिनेश यादव उपस्थित होते.

मानवनगरातील सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या बांधकामासाठी 48 लाख 41 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या भागातील इतर विकासकामांसाठी वाढीव निधी देणार असल्याचे सांगून उत्तर नागपूरचा विकास डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रासाठी निधी देण्यात येणार. या केंद्रात 21 वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. अनेक युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन, त्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळेल, असेही डॉ. राऊत म्हणाले.

पालकमंत्री श्री. राऊत यांनी आज उत्तर नागपुरातील वांजरी येथील हमीदनगर मुस्लिम स्मशानभूमी येथील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम तसेच पेविंग ब्लॉक लावणे, मौजा बिनाकी येथील इंदिरानगर पाठराबेवाडी येथील सुरक्षा भिंतीचे बांधकाम यासह विविध विकासकामांचे यावेळी भूमिपूजन केले.