Home राष्ट्रीय भीषण अपघातात खासगी बस अर्ध्यापर्यंत कापली, चार मृत

भीषण अपघातात खासगी बस अर्ध्यापर्यंत कापली, चार मृत

134

अपघाताची भीषणता किती असावी, ही बाब लक्झरी बस अर्धी कापली गेल्याची पाहिल्यानंतर येते. ही बस आपल्या डाच्या बाजूने चिरली असून, त्यात ट्रकचा चाकापर्यंतचा भाग शिरला आहे. (पहा छायाचित्र) यातील मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वापी : गुजरातमधील तापी जिल्ह्यात [ vapi accident ] मालेगावातील लग्न वºहाडाला भीषण अपघात झाला असून, यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. तर ही दुर्घटना तापी जिल्ह्यात शुक्रवारी (5 फेब्रुवारी) पहाटे घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

अन्य एका माहितीनुसार, नाशिक (महाराष्ट्र) जिल्ह्यातील मालेगावातील हजार खोली परिसरातून एक वºहाड खासगी बसमधून सुरतकडे लग्नासाठी निघाले होते. शुक्रवारी दुपारी लग्नाचा मुहूर्त होता. मात्र, ही बस शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास तापी जिल्ह्यात व्यारा-बाजीपुरा राष्ट्रीय महामार्गावर वालोद गावाजवळ असताना रस्त्यात पार्क केलेल्या ट्रकवर आदळली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच ते सातजण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वालोद पोलिस स्टेशनचे निरीक्षक व्ही. आर. वासावा यांनी या संदर्भात दिली.

आमची भूमिका…
अन्य माध्यमाप्रमाणे केवळ बातमी प्रकाशित करणे अशी ‘अभिवृत्त’ची [ abhivrutta ] भूमिका नसून अपघात कसे टाळता येतील़ आणि यातून जीवितहानी कशी टाळता येईल, याबाबत जागृती करण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात अपघातांच्या कारणांचा शोध घेत अभ्यास अहवाल तयार करणारे संजय मुंदलकर यांनी सांगितले, की वाहन कोणतेही असो रस्ता अपघाताला केवळ वाहनासंबंधी तांत्रिक चूकच कारणीभूत नसते़ यातील शक्यता परिस्थितीजन्य आणि स्थळ-काळानुसार वर्तवली जात असली तरी 99 टक्के ही मानवी चूक असते. मग ‘अपघातकर्ता’ (अपघातातील दुय्यम वाहन – यात बस) वाहन असो की अपघातधर्ता (अन्य वाहन – यात ट्रक) वाहन असो. कोणत्याही अपघातात या दोन बाबी महत्त्वाच्या असतात आणि चुकीला दोन्ही कारणीभूत असतात़ याठिकाणी ‘अपघातधर्ता’ वाहन रस्त्यात का उभे करण्यात आले? जर ते नादुरुस्त आहे वा तात्पुरते थांबवले गेले असल्यास त्याठिकाणी रस्त्यावरून धावणाºया अन्य वाहनांना दुरून दिसेल असे दिव्याच्या स्वरूपातील ‘आवाजी संकेत’ (बझर सिग्नल्स buzzar singles ) दिले होते काय? निश्चितच असे सिग्नल्स रस्त्यात थांबून असलेल्या वाहनाच्या मागे आणि पुढे काही ठराविक अंतरावरून दिले जाणे अत्यंत गरजेचे आहे.
वर्दळीच्या महामार्गावर अशाप्रकारे वाहन रस्त्यातच बंद पडले असेल वा नादुरुस्त झाले असल्यास महामार्ग पोलिसांना कळवले होते काय, असे प्रश्न उपस्थित होतात.
याशिवाय ‘अपघातकर्ता’ वाहनचालकाने निश्चित महाराष्ट्रातून रात्रीच्या वेळी प्रवास सुरू केला असणाऱ त्यामुळे त्याची पुरेशी झोप झाली होती का? बसमध्ये अन्य एक चालक उपलब्ध होता का? जर दोन्ही चालकांची आवश्यक झोप झाली नसेल, तर प्रवासात एखाद्या सुरक्षित ठिकाणी (जसे, सरकारी बसस्थानक वा पोलिस स्थानकाचा परिसर याठिकाणी आवश्यक परवानगी घेऊन…) बस थांबवून झोप घेण्याचा प्रयत्न केला का, असे प्रश्न उपस्थित होतात. याशिवाय बसचा ज्या वेगाला अपघात झाला, त्यावेळी तो वेग गरजेचा होता काय? अशा अनेक बाबींवर तपास होणे गरजेचे आहे़ असे असले तरी एकदा मृत झालेला जीव कदापिही परत येणे शक्य नाही.